हिंगोली : जिल्ह्यातील बाजार समित्यांतील हळदीच्या दरात घसरण सुरु आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी चितिंत आहेत. लॉकडाउनमुळे मोठ्या खरेदीदारांकडून खरेदी बंद आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरेदी हंगामात हळदीच्या दरात दोन ते अडीच हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा होत आहे.
तुलनेने कमी पाण्यात किफायतीशर उत्पादन मिळत असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर हळद लागवडीकडे वळले आहेत. दरवर्षी हळद लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत आहे. गतवर्षी जिल्ह्यात ३६ हजार २९९ हेक्टरवर लागवड झाली होती. लागवडीच्या सुधारित पध्दती तसेच काटेकोर पीक व्यवस्थापनामुळे हळदीच्या क्षेत्रातसोबतच एकरी उत्पादकता सरासरी २० क्विंटलपर्यंत वाढली आहे.
जिल्ह्यात हिंगोली, वसमत, जवळा बाजार, सेनगाव आदी बाजार समित्यांतंर्गंत हळद मार्केट विकसित झाले आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या हळद खरेदी करत आहेत. यंदा लॉकडाऊनमुळे मसाले, औषधी, सौंदर्य प्रसाधने आदींचे कारखाने बंद राहिले. मोठ्या खरेदीदारांकडून हळदीला मागणी नाही. सध्या हळद मार्केटमध्ये दररोज हजारो क्विंटल हळदीची आवक होत आहे.
एप्रिल महिन्यापासून दरात घसरण सुरु आहे. सध्या प्रतिक्विंटलला ४ ते ५ हजार रुपये दर मिळत आहेत. गतवर्षीच्या हंगामात सरासरी ६ हजार ते ७ हजार रुपयापर्यंत दर मिळाले होते. उत्पादकांना नुकसान सोसावे लागत आहे.

0 Comments